Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

prakash-mahanwar
, शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (21:52 IST)
social media
मुंबई,: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. प्रकाश  महानवर यांची नियुक्ती केली.
 
डॉ. प्रकाश महानवर (जन्म : 01.06.1967) सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत आहेत.
 
डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचा कार्यकाळ 5 मे 2023 रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.  त्यानंतर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती.
 
विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. सुरेशकुमार  (युजीसी प्रतिनिधी) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते.
 
समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘घड्याळा’साठी निवडणूक आयोगात ६ ऑक्टोबरला सुनावणी