Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘कोविशिल्ड’ची पुन्हा टंचाई; गुरुवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार

‘कोविशिल्ड’ची पुन्हा टंचाई; गुरुवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार
, गुरूवार, 29 जुलै 2021 (08:18 IST)
पिंपरी – कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लशीची पुन्हा टंचाई निर्माण झाली आहे. लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
 
किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पिटल चिंचवड येथे ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
 
45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन, किऑस्क प्रणालीद्वारे ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार!
 
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, पिंपळेनिलख इंगोले शाळा, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे 45 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण होणार आहे.किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 10 जणांना, ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे 90 जणांना डोस देण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जयंत पाटील यांच्यावर आज अँजिओग्राफी करण्यात येणार