Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 26 April 2025
webdunia

सांगलीचा रिअल लाईफ 'पुष्पा'

real life pushpa of sangli
, रविवार, 17 जुलै 2022 (18:44 IST)
सांगली पोलिस मुख्यालयाच्या हद्दीतून चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरातून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याने पोलीस मुख्यालय परिसराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चंदनाच्या या झाडाच्या चोरीची विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे.
 
 चार वर्षांपूर्वी पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याशेजारी असलेल्या चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. त्यावेळी झाडे चोरीला जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी धाव घेतल्याने चोरट्यांनी पळ काढला होता. हा प्रकार राज्यभर गाजला होता. 
 
यावेळी मात्र चोरटे तेथीलच ट्रॅफिक पार्कमधील दोन झाडांचे बुंधे घेऊन जाण्यात यशस्वी झाले आहेत. झाडे चोरीला गेल्याची नोंद विश्रामबाग पोलिसांत झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावले