महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा जाहीर केली असून आयोगा तर्फे 673 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे. ही भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग , पाणी पुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम विभाग , अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, आणि औषधी द्रव्य विभागातील 673 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. पूर्व परीक्षा 37 जिल्हा केंद्रावर 4 जून रोजी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. सविस्तर जाहिरात संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून अटी आणि शर्ती मान्य असणाऱ्या उमेद्वाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवार 2 ते 22 मार्च कालावधीत अर्ज आणि शुल्क भरू शकतात.
पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारावर उत्तीर्ण आणि पात्र असलेल्या उमेदवारांची स्वतंत्रपणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल. राज्यसेवा मुख्य परीक्षा 7 ते 9 ऑक्टोबर , स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि ब गट , मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर रोजी, विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर, निरीक्षक वैधमापन शास्त्र गट ब मुख्य परीक्षा 21 ऑक्टोबर, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा गट ब मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबर रोजी आयोजित होणार. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 28 मार्च असेल.