सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत सर्वत्र पाणी साचले आहे. हवामान खात्यानं सातारा, पुणे जिल्ह्याना रेड अलर्ट जारी केले आहे.
या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात मुंबई, रत्नागिरी, रायगड, पुणे, सिन्धुदुर्ग या जिल्ह्याना सोमवारी रेड अलर्टचा इशारा दिला आहे.
प्रशासनाला सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहे. नदीकाठी,दरडप्रवणच्या क्षेत्रात नागरिकांनी जाऊ नये पुलावरून पाणी वाहत असताना पुलाला ओलांडू नये. आवश्यकता असल्यास घरातून बाहेर पडावे असे नागरिकांना सूचना दिल्या आहे.
वीज चमकत असेल तर कोणत्याही झाडाखाली विसावा घेऊ नये, आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता नागरिकांनी सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी आपत्ती नियंत्रण कक्षाशी 1077 नंबर वर संपर्क करावे. असे आवाहन नागरिकांना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षा कडून करण्यात आले आहे.