Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला फेटाळून,आमदारांची जंगी मिरवणूक !

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला फेटाळून,आमदारांची जंगी मिरवणूक !
, रविवार, 5 सप्टेंबर 2021 (16:24 IST)
सध्या राज्यात कोरोनाचा वाढत्या प्रभावाला बघता मुख्यमंत्री यांनी नागरिकांना कोरोनाच्या  नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.सध्या सणासुदीचे दिवस आहे,सगळे सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.राज्यात नागरिकांनी कोणत्याही राजकीय आणि सामाजिक समारंभात गर्दी करू नये. असे आवाहन देऊन देखील त्यांच्या आवाहनांना धता देत कोरोनाकाळात भर पावसात सांगोल्यातील शिवसेनेचे आमदारांनी गर्दी जमवत जंगी मिरवणूक काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आवाहनाला फेटाळून लावले आहे.सध्या कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे.अशा परिस्थितीत आमदारांनी मिरवणूक काढून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिले आहे.त्यांनी असं केल्यामुळे कोरोनाची प्रकरणे वाढण्याची शक्यता वाढली आहे.
 
सध्या कोरोनाचा धोका कायम आहे.त्यात सांगोल्यात खवासपुर गावात शिवसेनेच्या आमदारांनी काढलेली ही मिरवणूक नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमरुल्ला सालेहने संयुक्त राष्ट्रांना आवाहन केले, म्हणाले - पंजशीरमध्ये त्वरीत काहीतरी करा, अन्यथा नरसंहार होईल