Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) २०-२५ जागा लढवणार

ramdas adthavale
, मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (21:37 IST)
येत्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या ४०० जागा निवडून येतील. तसेच या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) २०-२५ जागा लढवणार असल्याचे आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी लोकांमध्ये जाऊन काम करावे लागेल. विविध राज्यांमध्ये पक्षविस्तार करावा लागेल, असेही ते म्हणाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली.
 
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, आरपीआय आठवले गट एनडीएमध्ये आहे. एनडीए देशभरात मजबूत होत आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये आम्ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भाजपला समर्थन दिले. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला. त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढु शकत नाही मात्र मित्रपक्षांना निवडुन आणण्यासाठी मदत करु शकतो, मात्र जिथे पक्षाची परिस्थिती चांगली असेल तिथे लढु शकतो असेही ते म्हणाले.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करणार