मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या आणि स्वयंपाकाच्या गॅस च्या किमतीत वाढ झाल्यामुळे सर्व सामान्य जनतेचे हाल होत आहे. विरोधी पक्ष देखील मोदी सरकारवर सतत हल्ला करत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती वरून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या युवा संघटनेने म्हणजे युवा सेनेने वेगवेगळ्या ठिकाणी नवीन किमतीचे बॅनर लावले आहेत. युवा सेने ने हे बॅनर वांद्रे पश्चिमेत अनेक पेट्रोल पंप आणि रस्त्याच्या कडेला देखील लावले आहेत. बॅनरच्या वरील बाजूस युवासेनेने लिहिले आहे, की हे चांगले दिवस आहेत का?
या बॅनरमध्ये वर्ष २०१५ आणि २०२० च्या गॅस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची तुलना केली आहे आणि विचारले आहे की हेच चांगले दिवस आहे का? या बॅनरमध्ये २०१५ मधील पेट्रोलची किंमत ६४.६० रुपये सांगितली आहे आणि आज २०२१ मध्ये ही किंमत ९६.६२ रुपये प्रति लीटर झाली आहे.( मुंबईत आजची नवीनतम किंमत ९७ रुपये प्रति लीटर आहे).