जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कामशेत जवळ नायगाव येथे कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोघींचा मृत्यू झाला. तर चार महिला जखमी झाल्या आहे. वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा कार मधून सहा महिला जुन्या पुणे महामार्गावरून जात असताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कामशेत जवळ नायगाव येथे कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सीताबाई तुकाराम लालगुडे आणि सिद्धी तिकोने या जागीच ठार झाल्या. तर इतर चार जणी जखमी झाल्या आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.