गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना प्रत्येकाला काही वेगळं करण्याची उत्सुकता असते. अशात औरंगाबाद येथील वाळूज एमआयरडीसीमधील कामगारांनी भन्नाट कामगिरी केली आहे. मेटलमन कंपनीतील कामगारांना तयार केलेला रोबोट गणपतीची आरती करत आहे.
तर दुसरीकडे पुण्यातील एका दाम्पत्याने त्याच्या घरी Hi-Tech बाप्पा विराजित केले असून त्याची रोबोटच्या मदतीने आरती केली जाते. पुण्यातील तेजस सोनवणे आणि सारिका सोनवणे या दाम्पत्याने हे रोबोट तयार केले आहेत. एक रोबोच्या हातामध्ये आरतीचे ताट तर दुसरा रोबो घंटेचा निनाद करताना पाहायला मिळतो.
सोनावणे दाम्पत्य वारजे भागात असणाऱ्या त्यांच्या घरात दोन्ही रोबोट कडून बाप्पाची दररोज नियमित आरती केली जाते.