Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी पाट्यांसाठी संभाजीनगर महापालिकेचा दुकानदारांना 15 दिवसांचा अल्टिमेटम

मराठी पाट्यांसाठी संभाजीनगर महापालिकेचा दुकानदारांना 15 दिवसांचा अल्टिमेटम
, मंगळवार, 9 जानेवारी 2024 (09:39 IST)
social media
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सर्व दुकानांची व कार्यालयांची नाव फलक किंवा साइनबोर्ड मराठी भाषेत लावावेत, यासाठी महापालिकेने 15 दिवसांची मुदत दिली आहे.

तसे आदेश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. मनपा प्रशासकांनी रविवारी शहरातील काही भागात पाहणी करत दुकानाचे, प्रतिष्ठानचे नाव राज्य शासनाच्या आदेशानुसार मराठी भाषेत लिहिण्याचे निर्देश दिले. याशिवाय मोठ्या अक्षरात नावे लिहावे, असेही सांगितले.

तसेच, मराठी भाषेत साइनबोर्ड लावण्यासाठी त्यांनी 15 दिवसांची मुदत दिली. ही मुदत संपल्यावर सुद्धा दुकानदारांनी दुकानांचे साइनबोर्ड मराठीत नाही लावले, तर दुकाने आणि प्रतिष्ठानांना सील करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय.
 
शहरातील प्रोझोन मॉलसह शहरातील सर्व दुकाने व प्रतिष्ठान यांनी दुकानाचे नावफलक किंवा साइनबोर्ड मराठी भाषेत पण लावावे, असे आदेश आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले आहेत. मनपा प्रशासकांनी रविवारी प्रोझोन मॉलला भेट दिली. मॉलमधील सर्व शोरूम मालकांना त्यांच्या दुकानाचे, प्रतिष्ठानचे नाव राज्य शासनाचा आदेशानुसार मराठी भाषेत लिहण्याचे निर्देश दिले.

याशिवाय ज्या शोरूम्सचे नाव मराठी भाषेत बारीक अक्षरात लिहले आहे त्यांनी मोठ्या अक्षरात नावे लिहावे, असे निर्देश यावेळी प्रशासकांनी दिले. तसेच मराठी भाषेत साइनबोर्ड लावण्यासाठी त्यांनी दिवसाची मुदत दिली. ही मुदत संपल्यावर पण प्रोझोन मॉल आणि शहरातील इतर सर्व दुकानदारांनी त्यांच्या दुकानांचे साइनबोर्ड मराठी भाषेत नाही लावले तर अशा दुकानी आणि प्रतिष्ठानांना सील करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोनाचे नवीन 67 रुग्ण,2 हजार 728 कोविड चाचण्या