Sangli Murder Case: सांगलीतल्या मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ इथं एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेला धक्कादायक वळण लागलं आहे. या आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
जेवणात विषारी पदार्थ मिसळून या नऊ जणांची हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मांत्रिक आणि त्याच्या ड्रायव्हरवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून यामागे नेमकं कारण शोधण्याचं काम पोलीस करत आहेत. अब्बास महंद बागवान आणि धीर चंद्रकांत सरवशे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहे. या दोघांनी कुटुंबातील नऊ जणांना विष पाजून त्यांचा जीव घेतल्याचे तपासात समोर आले आहे.सांगलीचे पोलीस अधीक्षक दीश्रित गेडाम यांनी ही माहिती दिली आहे.
मृतांमध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 48), अर्चना पोपट वनमोरे ( वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28), माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वन (वय 15) अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि अक्काताई वनमोरे (वय 72) या नऊ जणांचा समावेश आहे.
गुप्तधनामुळे ही हत्या झाल्याचेही तपासात उघड झाले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, हत्येप्रकरणी अब्बास महमंदली बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवशे यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले दोन्ही संशयित मायाच्या घरी येत होते. आरोपी आणि माया गुप्त पैशांबाबत चर्चा करत होते.