Publish Date: Sun, 13 Aug 2023 (12:49 IST)
Updated Date: Sun, 13 Aug 2023 (12:53 IST)
आज सांगोल्यात स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहे. या पूर्वी ते 1 ऑगस्ट रोजी पुण्यात पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या लोकमान्य टिळक यांच्या कर्यक्रमात एकत्र दिसले होते. आता पुन्हा सांगोल्यात हे दोन नेते एकाच मंचावर आमने सामने येणार आहे.
सांगोल्यात शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार सोलापूर येथून या कार्यक्रमात पोहोचणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन वाजे पर्यंत येणार आहे. राष्ट्रवादीच्या बंड नंतर फडणवीस आणि पवार एकाच मंचावर भाषण करणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोण काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.