rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘शिवसेना स्फूर्तीगीत’ हे शिवसेनेचे नवे गाणे लाँच

Shiv Sena leader Sanitation and Water Supply Minister Gulabrao Patil launched the new Shiv Sena song 'Shiv Sena Spoorti Geet'
, मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (21:19 IST)
शिवसेनेचे नेते स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘शिवसेना स्फूर्तीगीत’ हे शिवसेनेचे नवे गाणे लाँच केले.

आम्ही शिवबाचे धारकरी.. शिवसेनेचे मानकरी’ अशा ओळी असलेले हे गाणे गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेनुसार ‘प्रभारंग फिल्म्स्’ यांनी तयार केले असून आदर्श शिंदे यांनी ते गायले आहे. निमति संदीप माने, कार्यकारी निर्मात्या उर्मिला हिरवे, गीतकार संतोष सातपुते, संगीतकार पार्थ उमराणी, एडिटर सत्यजित पाटील, शरद डहाळे या टीम ने अत्यंत कमी वेळेत हे गीत तयार करण्याचे आव्हान पूर्ण केले. स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने पत्रकार परिषदेत ते लाँच करण्यात आले.
या वेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “हे गीत म्हणजे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महान जीवनकार्याला निष्ठावंत शिवसैनिकानं अंतःकरणातून दिलेली मानवंदना आहे. इतकंच नव्हे तर बाळासाहेबांचा शिवधर्माचा, हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे.
Edited By - Ratandeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सटाणा :म्हणून रावण प्रतिमेचे दहन करण्यास विरोध