शिवसेना नेते संजय राऊत यांचे सहकारी सुजीत पाटकर व त्यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट कंपनीने कोविड सेंटरच्या नावावर शंभर कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची माहिती सोमय्या यांनी टि्वट करीत दिली आहे. किरीट सोमय्या ट्विट करत काय म्हणाले-
“मी न्यायालयात गेल्या नंतर आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा गैरव्यवहार 100 कोटींच्या वर असल्याने मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशाने याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. मला विश्वास आहे आता लवकरच कारवाई होईल,”असे सोमय्या म्हणाले.
Edited by: Ratnadeep Ranshoor