शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावरुन सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. हिंदू देवी-देवतांविषयी अंधारे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप वारकरी संप्रदायाने केला आहे. यासंदर्भात आता सेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. तसेत, त्यांनी वारकऱ्यांना काही सवालही केले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, अंधारे यांच्याविषयी टीका करणारा किंवा बोलणारा एक विशिष्ट गट आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना कायम वारकरी संप्रदायाबरोबर आहेत. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे. जुने व्हिडिओ व्हायरल करुन काहीच साध्य होणार नाही. सुषमा अंधारे यांच्यावर जे बोलत आहेत ते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि अन्य वाचाळवीर नेत्यांवर का बोलत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. जे नेते वारकरींविषयी बोलतात ते शिवाजी महाराज यांचा अपमान होतो तेव्हा का बोलत नाही. वर्तमानवर बोला, जुने व्हडिओ व्हायरल करण्यात काय अर्थ आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor