Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जब वक्त बुरा चल रहा हो, तो लोग… संजय राऊतांचा बंडखोरांना खोचक टोला

sanjay raut
, गुरूवार, 21 जुलै 2022 (15:13 IST)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक सत्तानाट्य रंगले. त्यावरुन राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ झाली. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले आणि शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले. आता या सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या असून त्यावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
 
राज्याच्या सत्तानाट्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी २ ट्वीट करत शायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे बंडखोरांवर टीका केली आहे. आज सकाळी संजय राऊतांनी केलेल्या ट्वीटमध्ये ओशो यांचे एक शेर शेअर करण्यात आले आहे. बंडखोरी केलेल्या शिवसेना आमदारांना ईडी, सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची भिती घालण्यात आल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा शिवसेनेने पहिल्यापासूनच केला आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटासोबत जाणारे आमदार, खसदारांची संख्या हळूहळू वाढताना दिसून आली. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी केलेल्या या ट्वीटचा संदर्भ लावला जात असून त्यांनी अप्रत्यक्षपणे या ट्वीटमधून बंडखोरांनाच लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. “जब वक्त बुरा चल रहा हो, तो लोग हाथ नहीं, गलतियां पकडते है!” असे संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चहा विक्रेत्याची मुलगी बनली आंतरराष्ट्रीय वेटलेफ्टर विजेती