Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साहित्य संमेलन आयोजित करण्यात सरहदला रस नाही

साहित्य संमेलन आयोजित करण्यात सरहदला  रस नाही
, बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (08:34 IST)
दिल्लीत ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात सरहद संस्थेला रस नाही आणि भविष्यात कधीच त्यासाठी पुढाकार घेतला जाणार नाही अशी भूमिका सरहद संस्थेतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
 
भविष्यात सरहदद संस्था संमेलन घेण्यास पुन्हा इच्छुक आहे का? असा प्रश्न अखिल भारतीय महामंडळाशी संबंधित व्यक्तींसह साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि दिल्लीतील मराठी बांधवांकडून सरहदद संस्थेला विचारला जात आहे.त्या पार्श्वभूमीवर सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी स्पष्टपणे मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांना पत्राद्वारे आपली भूमिका कळविली आहे.
 
नाशिकला संमेलनासाठी शुभेच्छा देताना भविष्यात योग्यवेळी दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले पाहिजे हीच सरहदची भूमिका होती, आहे आणि भविष्यातही राहील. मात्र कौतिकराव ठाले पाटील यांच्यासारख्या व्यक्तीगत अहंकार असणा-या प्रवृत्ती महामंडळात असपेर्यंत दिल्लीत संमेलन होणे अशक्य आहे असे वाटते याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. नाही. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची 95 व्या साहित्य संंमेलानाच्या आयोजनासाठी चाचपणी सुरू झाली आहे. नुकत्याच महामंडळाच्या झालेल्या बैठकीत आगामी साहित्य संमेलनावर चर्चा देखील करण्यात आली आहे. भविष्यात सरहद संस्था संमेलन घेण्यास पुन्हा इच्छुक आहे का? असा प्रश्न अखिल भारतीय महामंडळाशी संबंधित व्यक्तींसह साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि दिल्लीतील मराठी बांधवांकडून सरहद संस्थेला विचारला जात आहे.त्या पाशर््वभूमीवर सरहदद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी स्पष्टपणे मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांना पत्राद्वारे आपली भूमिका कळविली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मच्छी मार्केटमधील २७ मच्छी विक्रेत्यांचे स्थलांतरित