ठाणे महापालिकेनेही १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. एक पत्रक जारी करत ठाणे महापालिकेने पाणीकपातीची माहिती दिली. अपेक्षित पाऊस न पडल्याने मुंबई महापालिकेने २७ जूनपासून दररोजच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्राच्या माहितीनुसार, “मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला. ही १० टक्के पाणी कपात मुंबई महानगरपालिकेतर्फे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यालाही लागू आहे. त्यामळे मुंबई महापालिकेकडून ठाणे महानगरपालिकेला होत असलेल्या पाणी पुरवठ्यात २७ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे लिहिले आहे.
त्याशिवाय, “पाणी कपात लागू असताना अतिरिक्त जलजोडणी अथवा वाढीव जलजोडणीच्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी”, असेही या आदेशात म्हटले आहे.