सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (SET) 7 एप्रिल 2024 रोजी घेतली जाणार असून, यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तेव्हा भावी प्राध्यकांनी खऱ्या अर्थाने परीक्षेच्या तयारीला लागण्याची गरज आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाकडून एप्रिल 2024 मध्ये शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षा घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र तेव्हा ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली नव्हती. आता या परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांना सेटच्या परीक्षेच्या संभाव्य तारखेची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे.
सेट परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेची आणि परीक्षेची तारीख जाहीर केल्यानंतर पुणे विद्यापीठ परीक्षेच्या कामाला लागले आहे. सध्या विद्यापीठामध्ये सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याच्या काम केले जात असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. ती झाल्यानंतरच ऑनलाइन अर्जांना सुरुवात होणार आहे.