शरद पवार यांनी घटना दुरुस्ती करा असा पर्याय पुढे आणला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरूस्ती करणे शक्य असून घटना दुरूस्ती करण्याचा निर्णय जर केंद्र सरकारने घेतला तर विरोधकांना त्याची गरज मी समजावून सांगेन अशी भूमिका राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी घेतली आहे. मराठा समाजाला साठी जर घटना दुरूस्ती केली तर आरक्षण मिळू शकते असेही त्यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला शरद पवारांनी पाठींबा असून तेथे उपस्थित देखील होते. त्याआधी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीत साप सोडण्या संदर्भात जे वक्तव्य केले त्यामुळेच मराठा समाजातील आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत. आंदोलन शांततेत सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी बेजबाबदार वक्तव्यं करू नेये तर असे वक्तव्य केल्याने आगीत तेल ओतले अशीही टीका शरद पवार यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.