पश्चिम बंगालचे नाव बदलून आता 'बांग्ला' असे ठेवण्यात आहे. यासाठी राज्याचे नाव बदलण्याचे विधेयक राज्य विधानसभेत मंजूर करण्यात आले. तीन भाषांत राज्याचे नाव वेगवेगळे ठेवण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला होता. त्यानंतर आता राज्य विधानसभेने नाव बदलून ठेवण्याबाबत विधेयक मंजूर केले आहे.
पश्चिम बंगालचे नाव इंग्रजीत 'बंगाल', बंगालीत 'बांग्ला' आणि हिंदीत 'बंगाल' असे ठेवण्यासाठी राज्य विधानसभेने २९ ऑगस्ट २०१६ मध्ये ठराव मंजूर केला होता. राज्याचे नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २०११ पासून प्रयत्न करत होत्या. अखेर त्यांनी विधानसभेत विधेयक मंजूर त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.