Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवारांवर शरद पवार विश्वास ठेवत नाहीत- अजयकुमार मिश्रा

sharad pawar ajit pawar
, गुरूवार, 19 जानेवारी 2023 (08:39 IST)
अजित पवारांवर त्यांच्या काकांचाही विश्वास नाही.शरद पवार पक्षातील दुसऱ्याच नेत्याला महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते बनवणार होते. पण ऐनवेळी धमकी मिळाल्याने शरद पवारांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेते बनवले,असे विधान भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केलं. अजयकुमार मिश्रा यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा सातारा दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
यावेळी ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं.धर्मासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या व्यक्तीला ते धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या व्यक्तीवर मी काय टिप्पणी करू,मुख्यमंत्री पदासाठी तडजोड करणारी ही लोक आहेत,असा टोलाही अजयकुमार मिश्रा यांनी लगावला.
 
Edited by :  Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिक्षकाचे बस मध्येच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन