Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरद पवार महाराष्ट्राला लाभलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व- सुहास कांदे

suhas kande
, बुधवार, 3 मे 2023 (21:55 IST)
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अचानक राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली.  शरद पवार यांच्या निर्णयानंतर नाशिकचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 
 
सुहास कांदे म्हणाले की, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लाभलेले उत्तुंग असं व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची गरज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील देव म्हटलं तर त्यात वावग ठरणार नाही. अशा व्यक्तीची आज महाराष्ट्राला गरज आहे. परंतु जर त्यांनी निवृत्ती घेतली तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव असेल. मी जनतेच्या वतीने शरद पवार यांना विनंती करतो की 'आपली महाराष्ट्राला, देशाला गरज आहे. त्यामुळे आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ नये, शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही राजकारण करत आलो आहे. सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाने देशाच्या राजकारणात मोठे पाऊल टाकले. 
 
ते पुढे म्हणाले कि, आज महाराष्ट्रासह देशाचे नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पहिले जाते. शरद पवार यांना पाहूनच आम्ही राजकारणात आलो, असल्याचे कांदे म्हणाले. शरद पवार यांनी जर निवृत्ती घेतली तर याचं पुढचं राजकारण हे खरंतर सांगता येणार नाही. तो पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. यावर ते निर्णय घेतील असेही ते म्हणाले. 
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चाटूगिरी आणि चोंबडेपणा करू नका, नाना पटोलेंनी संजय राऊतांवर शाब्दिक हल्ला