Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात; अजित पवार गटाचा युक्तीवाद

ajit panwar sharad panwar
, मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (08:10 IST)
Sharad Pawar शरद पवार हे आपले घर चालवल्यासारखे पक्ष चालवतात तसेच जो व्यक्ती निवडून आला नाही तो पक्षातील इतरांची नेमणुक कशी काय करू शकतो असा प्रश्न अजित पवार गटाकडून विचारला गेला आहे. शिंदे- फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सामिल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह कोणाचे यावर निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान हा युक्तीवाद केला गेला.
 
मागल्यावेळी अजितदादा गटाकडून युक्तीवाद केल्य़ानंतर आज पुन्हा अजित पवार गटाने युक्तीवाद केला. मागल्या वेळी शरद पवारांच्या अध्यक्षपदाला अजित पवार गटाकडून आव्हान देण्यात आले होते. 10 आणि 11 सप्टेबर 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनामध्ये झालेल्या मुद्द्यावरच प्रश्न उपस्थित केले गेले. तसेच शरद पवारांच्या निवडीसाठी ज्या लोकांनी मतदानान केले त्यांची निवड योग्य नव्हती असा दावा अजित पवार गटाकडून केला जात होता. या निवडीमध्ये लोकशाही नियमांचे पालन केले गेले नाही असाही आरोप अजित पवार गटाने केला होता.
 
आज झालेल्या युक्तीवादमध्ये अजित पवार गटाने शरद पवार यांना लक्ष्य करताना त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले. शरद पवार हे घर चालवल्या प्रमाणे पक्ष चालवतात असे सांगून शरद पवारांची पक्षामध्ये एकाधिकार शाही आहे असा दावा अजित पवार गटाने केला.
 
त्यात बरोबर जे लोकांमधून निवडूण आले नाहीत ते पक्षाच्य़ा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कशा काय करू शकतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शरद पवार हे राज्यसभेचे खासदार असल्याने त्या पार्श्वभुमीवर हा प्रश्न विचारण्यात आला आहे. तसेच पक्षामध्ये कोणत्याही प्रकारच्या निवडणुका होत नव्हत्या तर त्या फक्त नियुक्त्या व्हायच्या. पक्ष कुणाचा हे आमदार आणि खासदार ठरवतात. आमच्याकडे 40 हून जास्त आमदार असून दिडलाखाहून पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्रे असल्याचा दावाही निरज कौल यांनी अजित पवार गटातर्फे मांडला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर