राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नवी मुंबईत भर पावसात सभा घेतली. शरद पवार यांची नवी मुंबईतील नेरुळ मध्ये सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी भर पावसात सभेतून आपले मार्गदर्शन दिले. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्त्ये आणि त्यांचे चाहत्यांनी गर्दी केली होती.
त्यांच्या भाषणात तोच जल्लोष आणि उत्साह बघायला मिळाला. जो त्यांनी साताऱ्यात भरपावसात घेतलेल्या सभेत दिसला. साताऱ्याच्या खासदार उदयनराजे भोसले यांनी एनसीपीला सोडून भाजप मध्ये प्रवेश केला आणि सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढली त्यात भोसले पराभूत झाले. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात भरपावसात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांच्यातील जोश आणि उत्साह पाहायला मिळाला.आज पुन्हा त्यांनी नवी मुंबईत भरपावसात सभा घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात शरद पवार म्हणाले, आज अनेक महिलांनी चांगले स्टॉल उभारले आहे पण पावसाने निराश केले. आपण या निराशावर मात करून संघर्ष करून धैर्याने पुढे जायचं आहे.
या मेळाव्यात 300 हुन अधिक महिला बचतगट सहभागी झाले होते. मात्र पावसाने आणि वाऱ्याने या मेळाव्यात धांदल उडाला. पवारांनी महिलांना उत्साह देण्यासाठी भरपावसात मार्गदर्शन दिले. त्यांच्या सभेसाठी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अनेक लोक थांबले होते.