Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shegaon Gajanan Maharaj Prakat Din 2023 शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

Shegaon Gajanan Maharaj Prakat Din 2023 शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
, सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (11:54 IST)
श्री गजानन महाराजांच्या 145 व्या प्रकट दिनानिमित्त 13 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी शेगावमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. प्रकट दिनानिमित्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश आणि गुजरात इथून देखील पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला साजरा केला जातो. 
 
"श्री गजानन महाराज की जय" आणि "गण गण गणांत बोते" च्या जयघोषात संपूर्ण शेगाव दुमदुमुन निघाले आहे. श्री गजानन महाराज प्रकट दिन शेगावात थाटात साजरा केला जातो. शेगावहून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढण्यात येत आहे आणि भाविक श्री गजानन महाराजाच्या पादुकांचे पूजन करत आहे. 
 
शेगावात गणगण गणात बोते चा गजर पाहायला मिळत आहे. संपूर्ण मंदिर परिसर सजवण्यात आले आहे. संपूर्ण शेगाव पूजा- आरती, पालखी सोहळा, अभिषेक, याने भक्तिमय झाला आहे. तर पारायण करुन भाविक महाराजांचा आशिर्वाद घेत आहे. इतर राज्यातून हजारो भाविक आपल्या दिंड्या घेऊन शेगावात दाखल झाल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या