Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सत्तारांच्या वक्तव्यांनी शिंदे गट अडचणीत; एकनाथ शिंदेंनी सत्तारांची अशी केली कानउघाडणी

eaknath shinde
, बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (07:32 IST)
मुंबई  –  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सत्तार यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यभरात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात राज्यभरात सत्तारांविरोधीत राष्ट्रवादीकडून आंदोलन होत आहे. परिणामी, शिंदे गट चांगलाच अडचणीत आला आहे. याची गंभीर दखल शिंदे गटाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी सत्तारांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
 
विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तार यांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करत आहेत.” अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गटही अडचणीत आला आहे. अब्दुल सत्तारांच्या विधानाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करुन चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते. यापुढे अशी वादग्रस्त विधाने करु नका, असंही एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तारांना बजवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील बंगल्यावर दगडफेकही केली. तसेच या विनाधप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांची २४ तासात मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन केली आहे.
राज्यात राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी होणारे आंदोलन आणि शिंदे गटाची होणारी बदनामी लक्षात घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने सत्तारांना फोन केला. आणि या सर्व विषयावर त्यांनी सत्तारांना चांगलीच समज दिली आहे. आपण कुठले आणि काय वक्तव्य करीत आहोत, कुणाविषयी करीत आहोत, याचे भान ठेवावे याची जाणीवकही कडक शब्दात शिंदेंनी करुन दिल्याचे सांगितले जात आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन केलं. यावेळी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली. काही कार्यकर्त्यांनी बंगल्यावर दगडफेक करत काच्या फोडल्या आहेत.
 
प्रकरण चिघळताच मागितली माफी
सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच्या वापरलेले आक्षेपार्ह शब्द मागे घेत अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली. मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. खासदार सुप्रिया सुळे किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील, तर मी खेद व्यक्त करतो आणि शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो, असे सत्तार म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करण्याच बंद करावं