एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा एक गट असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटानेही मुंबई महापालिकेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकांच्या आधी शिंदे गट मुंबईत १५० शाखा सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या शिंदे गटाने मुंबईत ३० शाखा सुरू केल्या आहेत. येत्या दोन महिन्यात १५० शाखा सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना भवनसमोरील कोहीनूर इमारतीमध्ये शिंदे गट कार्यालय सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेतील दोन गट आमने-सामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक ही शिंदे गटासाठी लिटमस टेस्ट असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे, तर दुसरीकडे शिवसेना हे नावही वापरता येणार नसल्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आयोगाने दोन्ही गटांना नवे चिन्ह आणि नवी नाव दिली आहेत.
Edited By- Ratandeep Ranshoor