भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी किरीट सोमय्यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे, कोलाई व महाकाली येथील जागेच्या प्रकरणी खोट्या आणि बिनबुडाचे आरोप करुन जनमानसात आपली, कुटुंबांची व पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप वायकरांनी सोमय्यांवर केला आहे.
रवीद्र वायकर यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनुसार सोमय्या यांनी वरील दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास पुढील क्रिमिनल कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वायकर यांनी दिला आहे. काही महिन्यांपुर्वीच किरीट सोमय्या यांनी मनिषा रविंद्र वायकर तसेच रश्मी उद्धव ठाकरे यांनी अलिबाग कोर्लाई येथे खरेदी केलेल्या संयुक्त जमिनीवर १९ बंगले असल्याचा तसेच वरील माहिती निवडणुक आयोगाकडे लपविल्याचा दावा केला होता