शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. त्यांना चिकनगुनियाची लागण झाली असून त्यांनी १५ दिवसांचा अवधी ईडीकडे मागून घेतला आहे. भावना गवळी यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावला असून त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये १७ कोटींच्या कथीत गैरव्यवहाराप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. याआधीसुद्धा भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावून ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, त्या गैरहजर राहिल्या. त्यामुळे ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावत आज ईडी चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, देखील गैरहजर राहणार आहेत. चिकनगुनियाची सबब देत त्यांनी १५ दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये बदल करुन कंपनीत रुपांतर केल्याप्रकरणी संचालक सईद खानला ईडीने अटक केली आहे.