Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'लोकसभा-विधानसभेला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस जोमाने एकत्र काम करेल' - शरद पवार

'लोकसभा-विधानसभेला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस जोमाने एकत्र काम करेल' - शरद पवार
, गुरूवार, 10 जून 2021 (15:37 IST)
उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे 3 पक्ष अधिक जोमाने एकत्र काम करतील, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त बोलत असताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
 
ते म्हणाले, "सरकार पडण्याबद्दल अनेकांनी आडाखे बांधले आहेत. पण मला एवढचं सांगायचं आहे की, हे सरकार टिकेल. पुढची 5 वर्षं काम करेल. हे सरकार नुसतं 5 वर्षं नाही तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमानं एकत्र काम करून सामान्य जनतेचं प्रभावीपणानं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही."
 
शरप पवारांच्या भाषणातील मुद्दे-
देशात अनेक पक्ष आले आणि गेले. काही लोकं गेल्यामुळे नवीन लोकं तयार झाले. राजकारणात सतत नव्या पिढीने काम करत राहीलं पाहीजे. राष्ट्रवादीमध्ये ही नवी पिढी तयार होतेय. त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम आम्ही करतोय.
शिवसेना आणि आपण एकत्र का आलो? पर्याय समोर आला आणि तो लोकांनी स्वीकारला. शिवसेनेबरोबर आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र गेले अनेक वर्ष शिवसेनेला जाणतो आहे.
शिवसेनेने इंदीरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता. त्यामुळे शिवसेना विश्वास असणारा पक्ष आहे. राज्यातले नेते आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना भेटले. तेव्हा परत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
हे सरकार महिनाभर टिकेल, या आठवड्यात पडेल, वर्षभरात पडेल असं बोललं गेलं. पण हे सरकार टिकेल, पाच वर्षे काम करेल याबाबत कोणतीही शंका घेण्याची गरज नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाजीपुरात दिवसा उजेडात HDFC बँकेत एक कोटी 19 लाखांची लूट, कर्मचारी व ग्राहकांना ओलीस ठेवले