Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला

eknath shinde
, सोमवार, 27 जून 2022 (09:23 IST)
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिंदे गटाने नियुक्त केलेले मुख्य प्रतोद भरत गोगावले यांचा हा व्हिडिओ आहे. त्यात गोगावले यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रथमच अतिशय गंभीर आरोप केला आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सेना आमदारांची उद्धव यांनी साधी बैठक तरी घेतली का, असा खडा सवाल गोगावले यांनी उपस्थित केला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार हे निधी देत होते, असे गोगावले यांनी म्हटले आहे. तसेच, शिवसेनेचे खच्चीकरण करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात पुढे जात होता. या सर्व कठीण परिस्थितीत एकनाथ शिंदे आम्हा सर्व शिवसेना आमदारांना आधार दिला. आम्हा सर्व आमदारांच्या आग्रहाखातरच एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक आणि शिवसैनिकांच्या हितासाठी ही भूमिका घेतली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बंडखोर आमदारांची आता सुप्रिम कोर्टात धाव; ही आहे प्रमुख मागणी