महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर माविआला मोठा धक्का बसला आहे. आता शिवसेने ठाकरे गटाने मोठे पाऊल उचलले आहे. पक्षाकडून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष विरोधी कारवाई मध्ये सहभागी होण्याबद्दल त्यांची ह्कालपट्टी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, पक्षाने जारी केलेल्या पत्रकानुसार, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विकास चाळके आणि चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांना पक्षातून हकलण्यात आले आहे.
सध्या यूबीटी मध्ये नेत्यांची गळती सुरूच आहे. नुकतेच उद्धव ठाकरे पक्षातील शिलेदार राजन साळवी यांनी शिवसेना यूबीटी पक्ष सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तसेच रत्नागिरीतील अनेक पदाधिकारी देखील ठाकरे पक्षाला सोडून शिवसेना शिंदे पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत पक्षातून गळती सुरु असताना पक्षातून तीन जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे.