Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक! ऐतिहासिक पन्हाळा गडावर दारुपार्टी, शिवप्रेमींची कारवाई करण्याची मागणी

धक्कादायक! ऐतिहासिक पन्हाळा गडावर दारुपार्टी, शिवप्रेमींची कारवाई करण्याची मागणी
, रविवार, 24 जुलै 2022 (15:37 IST)
ऐतिहासिक पन्हाळागड हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे आहे. या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडीचा किल्ला म्हटले जाते.  या किल्ल्याच ऐतिहासिक महत्त्व असून ते इतिहासाच्या वारसाला जपणारे आहे. या ऐतिहासिक पुरातात्विक धरोहरचा मान राखण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक पन्हाळा गडावर काही हुल्लडबाजांनी चक्क दारू पार्टी केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या दारुपार्टीत काही महिलांचा समावेश देखील होता. काही पर्यटक पर्यटनासाठी तेथे गेले असता गडावरील झुणका भाकर  केंद्रात ही दारू पार्टी सुरु असल्याचे वृत्त आहे. शिवप्रेमींनी पन्हाळा किल्ला वर मद्यपान करण्याऱ्या मद्यपींचा विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. किल्ले पन्हाळगडावर पर्यटकांची दारू पार्टी समोर आल्यानंतर राज्यभरातील शिवभक्त चांगलेच आक्रमक झाले आहेत.
 
महाराष्ट्रातील शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांची सातत्याने पडझड होत आहे. मात्र पुरातत्व विभाग, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने शिवभक्त हे चांगलेच नाराज आहेत. महाराष्ट्रातील शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांची सातत्याने पडझड होत आहे. मात्र पुरातत्व विभाग, महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने शिवभक्त हे चांगलेच नाराज आहेत. काही दिवसांपूर्वीच पन्हाळगडावरील बुरूज ढासळला होता. गेल्यावर्षीही त्या ठिकाणी बुरुज ढासळण्याची घटना घडली होती.
 
पुरातत्त्व खात्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याने चांगलाच संताप व्यक्त होत आहे.काही दिवसांपूर्वीच पन्हाळगडावरील बुरूज ढासळला होता. गेल्यावर्षीही त्या ठिकाणी बुरुज ढासळण्याची घटना घडली होती. पुरातत्त्व खात्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याने चांगलाच संताप व्यक्त होत आहे.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Petrol Diesel Price Today: रविवारी दिलासा, पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर