येत्या काळातील राजकारणाची सूत्र ही आपल्याच हाती असतील, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार जुन्नर दौऱ्यावर होते तिथं जुन्नर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.
"राजकारणात येताना मी खूप पुढचा विचार करुन आलोय. पदासाठी नाही, मात्र या महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. मात्र, लांबचं राजकारण करत असताना सहकारी मित्रांना कधीच विसरणार नाही," असं म्हणत रोहित पवारांनी पुढची राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्र आपल्याच हाती येणार असल्याचं स्पष्ट संकेतच त्यांनी दिले.
"आम्ही कायम जमिनीवरच राहणार आहोत. जमिनीवर राहण्याची मागच्या पिढीचा शिकवण स्वीकारुन ती आत्मसात केली आहे. 2024 पर्यंत याच शिकवणीतून आम्ही चालणार आहोत. मात्र, 2024 नंतरचा काळ हा युवकांचा काळ आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपण घेणार, यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच, पण निर्णय मात्र नवीन पिढीचे रहाणार आहेत," असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.