राज्य सरकार ने ग्रामीण भागातील गरीब नागरिक शहरात येऊन उपाशी राहू नये या साठी शिवथाळी सुरु केली. जेणे करून या योजनेचा लाभ सर्वांनां मिळावा. आता या शिवभोजन केंद्रातील एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळच्या महागाव येथील एका शिवकेंद्रात ग्राहकांना दिलेली शिवभोजन थाळी आणि स्वयंपाकातील भांडी चक्क शौचालयातील पाण्याने धुतले जातात. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ पाहून अक्षरश: किळस येते. लोकांच्या आरोग्याशी कशा प्रकारे खेळले जात आहे. हा दाखवणारा हा व्हिडीओ आहे. हे शिवभोजन केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तेचे आहे. नागरिकांचा आरोग्याशी खेळण्याचा प्रकार म्हणजे जेवण्याची भांडी शौचालयाच्या पाण्यानी धुणे. आता या प्रकरणावर शिवभोजन केंद्रचालकावर काय कारवाई केली जाते या कडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे. गरिबांना कमी दरात चांगले जेवण मिळावे या साठी ठाकरे सरकार ने ही शिवभोजन थाळी सुरु केली होती.