Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा

शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा
, सोमवार, 17 जानेवारी 2022 (10:43 IST)
सध्या देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉन ने हैराण केले असता आता या नंतर कोरोनाच्या औषधांचा तुटवडा शासकीय रुग्णालयात होत आहे. शासकीय रुग्णालयात कोरोनाची औषधे मिळत नसल्याचे रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. कोरोनाच्या उपचारासाठी लागणारी अत्यावश्यक औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांच्या  नातेवाईकांना औषधे बाहेरून आणण्याची वेळ आली आहे. शासकीय रुग्णालयात बिले थकल्याने औषधांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. औषधांची पुरवणी केल्यावर देखील हाफकीन संस्थेकडे अजून सुमारे 90 कोटींची थकबाकी आहे. उर्वरित थकबाकी मिळाल्या शिवाय औषध पुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा औषध पुरवठादारांनी दिला आहे. 
हाफकिन संस्थेचे संचालकांशी अनेक वेळा पत्र व्यवहार केल्यानंतर देखील 2019-20 पासून ची 90 कोटी रुपयांची थकबाकी आहे. अद्याप ही थकीत रक्कम मिळाली नाही असे औषध पुरवठादारांनी सांगितले. 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पाहता आवश्यक साधन सामग्री डॉक्टरांना पुरवावी .अन्यथा राज्यावर आरोग्याचे संकट येण्याची शक्यता वर्तवत नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारने त्वरित कारवाई करत आवश्यक वस्तूंचा साठा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून द्यावा असे आदेशात सांगितले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांगली बातमी: मार्चपासून 12-14 वर्षांच्या मुलांचे लसीकरण होऊ शकते