Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझी चूक ती काय ? मला गुणवत्तेवर मिळाली शिष्यवृत्ती!

माझी चूक ती काय ? मला गुणवत्तेवर मिळाली शिष्यवृत्ती!
, शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (09:14 IST)

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची कन्या श्रुती बडोले यांना शिष्यवृत्ती मिळाली म्हणून फार कांगावा केला गेला आहे. मात्र त्यांचे आधीचे शिक्षण पाहिले तर थक्क करणारे आहेत. त्यांच्यावर होत असलेली टीका यामध्ये श्रुती व्यथित झाल्या आहेत. माझे वडील मंत्री यात माझी चूक काय असा प्रश्न त्या विचारात आहेत. तर त्यांनी एक भावनिक पत्र Facebook वर इंग्रीजीत  लिहिले असून माझी    चूक काय असे म्हणत मी शिष्यवृत्ती सोडत आहे   असे सांगितले आहे.

मी  आयआयटी मद्रासमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते. युकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समध्ये मी माझं एम एस्सी पूर्ण केलं. याठिकाणी मी गुणवत्तेनुसार माझा प्रवेश आणि शिक्षण झालं. विद्यापीठाने गुणवत्तेमुळे मला शिष्यवृत्ती दिली (सरकारने नव्हे). अवकाश संशोधनात काम करायचं हे माझं स्वप्न होत त्यानुसार मी एक एक पायरी चढत गेले तीही गुणवत्तेनुसारच, त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते.

अॅस्ट्रोफिजिक्स या विषयात जगातल्या पहिल्या सव्वीसव्या विद्यापीठात माझी निवड झाली. ती गुणवत्तेनुसारच झाली आहे. हे सत्य आहे.मला यापूर्वी गुणवत्तेनुसार परदेशातल्या विद्यापीठांनी शिष्यवृत्ती दिली आहे. पण पीएचडीसाठी शिष्यवृत्तीची या विद्यपीठात सवलत नाहीय. गुणवत्तेनुसार माझी निवड झाली आहे तर मी याच विद्यापीठात  प्रवेश घेणार म्हणून मी राज्य सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. जगातल्या पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत असेल तर त्या विद्यार्थ्याला कुठलाही आर्थिक निकषांची अट नाही हा जीआर आहे. तरी मंत्र्यांची मुलगी आहे यावर वाद होतील हे आधी वडिलांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे वडिलांनी या निवड प्रक्रियेपासून स्वतःला बाजूला केलं. मी कुणाला डावलून शिष्यवृत्ती मिळवली का? जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठात प्रवेश घेताना आर्थिक निकष लागू नाहीत हा माझ्या शिक्षणापूर्वीचा नियम आहे. यात मी पात्र असेल तर यात माझा दोष आहे का? माझं यापूर्वीच शिक्षण गुणवत्तेनुसार झालं आहे. आता वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का?

कुणाचाही हक्क कधी डावलला नाही आणि कधी डावलणारही नाही. वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल आणि यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असेल, तर मी शिष्यवृत्ती नाकारत आहे. पण मी शिकणार आणि अवकाश संशोधनात जाणारच. सावित्रीबाई आणि बाबासाहेबांचं शिक्षणासाठीच स्वप्न साकार करण्यासाठी.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विमान प्रवासासाठी सरकारी ओळखपत्र बंधनकारक