Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अकोल्यात दोन कारांची धडक होऊन अपघातात दोन बाळांसह सहा जण ठार

अकोल्यात दोन कारांची धडक होऊन अपघातात दोन बाळांसह सहा जण ठार
, शुक्रवार, 3 मे 2024 (20:09 IST)
अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातात दोन लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. 
 
या अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. वाशीम मार्गावर दोन कारची एकमेकांना धडक होऊन अपघात घडला. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अपघातात आमदार किरण सरनाईक यांचा पुतण्या रघुवीर सरनाईक, त्यांची बहीण आणि तीन नातेवाईक एसयूव्ही कारने अकोला जात असताना त्यांच्या वाहनाला समोरच्या कारची धडक झाली. या अपघातात आमदारांच्या तीन नातेवाईकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये किरण सरनाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक(28) , शिवानी अजिंक्य आमले(30), स्मिरा अजिंक्य आमले(1), सिद्धार्थ यशवंत इंगळे(31), अशी मृतांची नावे आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहे. 
 
तर पियुष भगवान देशमुख,(10), सपना भगवान देशमुख(35), आणि श्रेयस इंगळे(3) अशी जखमींची नावे आहे. जखमींवर अकोल्याचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघातामुळे सरनाईक कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 
 
Edited By- Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिक्षकांचा अर्धा पगार तुम्हाला, अर्धा आम्हाला, नितीन गडकरींचा लातूरच्या सभेतून काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल