rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्यार्थ्यांनी कसरतीला जीवनशैली बनवावी- महापौर

snehal ambekar
, गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (10:30 IST)
संगिताच्या तालावर  आधारित व्यायाम प्रकाराचा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ
 
बृहन्मुंबई महापालिका शाळेतील  विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात दैनंदिनपणे व्यायाम करणे आवश्यक असून या कसरतीला जीवनशैली बनविल्यास आपले आरोग्य नेहमीसाठी सुदृढ ठेवण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर .स्नेहल आंबेकर यांनी केले.
 
चित्रपट अभिनेता जॅकी भगनानी यांनी बृहन्मुंबई महापालिका शाळेतील  विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुस्तीसाठी ‘कसरत’ या नावाने संगीताच्या तालावर व्यायाम करण्याचा कार्यक्रम विकसीत केला असून   या कार्यक्रमाचा शुभारंभ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व  मुंबईच्या महापौर  स्नेहल आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक २८ डिसेंबर २०१६ रोजी वरळी सी फेस येथील महापालिका शाळेत पार पडला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
 
या समारंभास चित्रपट अभिनेता जॅकी भगनानी, शिक्षण समितीच्या अध्यक्षा  हेमांगी वरळीकर, स्थानिक नगरसेविका  मानसी दळवी  हे  अतिथी म्हणून उपस्थित होते. 
 
महापौर  स्नेहल आंबेकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,  बृहन्मुंबई महापालिका शाळा या सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण होत असून येणाऱया काळात पालकांची रांग ही खासगी शाळा प्रवेशासाठी न लागता महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी  लागली पहिजे, तरच आपण आपले ध्यैय पूर्ण करण्यात यशस्वी होऊ असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, महापालिकेच्या शाळांमध्ये हा चांगला नविन उपक्रम सुरु होत असून याचा प्रातिनिधीक स्वरुपातील कार्यक्रम आज संपन्न होत आहे. व्यायामुळे शरीरासोबत मनही प्रसन्न राहण्यास मदत होत असून जॅकीने सुरु  केलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
 
शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रत्येक शाळांमध्ये भेट देऊन त्याच्या उपयुक्ततेचा आढावा घेऊन महत्व पटवून देणार असून या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा  दिल्या. 
 
स्थानिक नगरसेविका मानसी दळवी यांनी महापालिकेने चांगला उपक्रम राबविल्याबदद्ल शुभेच्छा  देऊन सर्वांनी यातून प्रेरणा घ्यावी अशी सूचना केली. प्रारंभी, चित्रपट अभिनेता जॅकी भगनानी यांनी या उपक्रमामागची पार्श्वंभूमी विशद केली.यानंतर एक प्रबोधनात्मक दृकश्राव्य चित्रफितीतून उपस्थितांना व्यायामाचे महत्व सांगणारा संदेश प्रसरित करण्यात आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिर्डी विमानतळ लवकरात लवकर सुरू होणार