Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तर मी एसीबी कार्यालयासमोर जाहीरपणे आत्महत्या करेन, सुधाकर बडगुजर यांचे थेट आव्हान

sudhakar badgujar
, सोमवार, 18 डिसेंबर 2023 (20:19 IST)
मी दिलेली कागदपत्र खोटी असेल हे सिद्ध झाले तर मी एसीबी कार्यालयासमोर जाहीरपणे आत्महत्या करेन असे सांगत ठाकरे गटाचे नाशिक शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी थेट आव्हान दिले. यावेळी त्यांनी सांगितले की, आम्हाला पोलिसांशी संघर्ष करायचा नाही. पण शिवसैनिकांवर चुकीच्या केसेस दाखल केल्या जातात. हा त्रास देण्याचा प्रकार. अन्यायकारक कारवाई करू नका सत्ता येते, सत्ता जाते सत्त्तेचा उन्माद फार काळ टिकत नाही असेही ते म्हणाले.
 
यावेळी बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एसीबी ने अचानक काल रात्री ७ वाजता नोटीस दिली. ७.३० वाजता माझ्या दोन्ही बंगल्यावर छापा टाकला. त्यापूर्वी एसीबी ने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला, मी माझ्या आयुष्यात कधीच कुणाची फसवणूक केली नाही. हे माझ्या जिव्हारी लागलं मला निवडणूक लढवायची होती, २००६ ला मी कंपनीतून राजीनामा दिला. रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर देखील झाले. कोर्ट पीटिशन झालं, २०११ ला कोर्ट ऑर्डर देखील झाली. एसीबी ला कोर्ट ऑर्डर माहीत नव्हती का? निवृत्ती आणि सेवा निवृत्ती कधी झाली हे या कोर्ट ऑर्डर मध्ये आहे. २०१३ मध्ये तक्रार दिली. मग एसीबी ला १० वर्षे का लागले? अन्याय करण्यासाठी पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करतेय. पोलिसांनी थोडा संयम ठेवायला हवा. म्यूनसिपल सेनेच्या कार्यालयाच्या ताब्याच्यावेळी देखील असेच झाल्याचे ते म्हणाले.
 
यावेळी त्यांनी ह्युमन राईट्स आणि सेंट्रल व्हिजीलन्सचा आमच्याकडे पर्याय आहे. सर्व पोलीस दबावात काम करतात असे नाही, काही पोलीस चागलं काम करतात असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सांगितले की, चौकशीला आता जाणार नाही. मी एसीबीला पत्र देतोय. माझ्यावर जे कलम लावलेले आहेत, त्याची माहिती कोर्टातून मला काढावी लागेल. त्यासाठी मला ७-८ दिवसांची मुदत द्यावी असेही त्यांनी सांगितले.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुधाकर बडगुजर : सलीम कुत्तासोबत डान्स केल्याच्या आरोपाचं प्रकरण काय आहे?