Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समाज माध्यमे म्हणतात कि जगात इतके प्रश्न असताना उर्फीचे कपडे महत्वाचे की महिलांचे प्रश्न ..?

समाज माध्यमे म्हणतात कि जगात इतके प्रश्न असताना उर्फीचे कपडे महत्वाचे की महिलांचे प्रश्न ..?
उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या दोघी सध्या आमने सामने आहेत. या दोघींमध्ये उत्तर प्रत्युत्तराची मालिका सुरू आहे. दोन महिला आमने सामने सल्याने हा वाद चांगलाच रंगला आहे. चित्रा वाघ माध्यमांवर प्रतिक्रिया देतात. उर्फिच्या ड्रेसिंग स्टाईल वर त्या प्रश्न उपस्थित करतात. तर त्या प्रतिक्रियांना प्रत्युत्तर देत उर्फी चित्रा वाघ यांना समाज माध्यमांवर डिवचते.
 
दरम्यान चित्रा वाढ आणि उर्फी जावेद यांच्यातील हा वाद सुरू असताना मात्र उर्फी च्या कपड्यांना फॅशन म्हणावं की अश्लीलता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उर्फीच्या कपड्यावरून चित्रा वाघ तिच्यावर हल्लाबोल करतात. दुसरीकडे उर्फी त्यांच्याशी पंगा घेते. ‘मेरी डीपी इतनी धासू, चित्रा मेरी सासू’ अशा अनेक पोस्ट करत ती समाज माध्यमांच्या माध्यमातून चित्रा वाघ यांची खिल्ली उडवते. मात्र उर्फीचे असे कपडे घालणं हे कायद्या विरोधात आहे का ? असा देखील एक प्रश्न उपस्थित होत आहे.
 
कायदे तज्ञांना याबद्दल विचारलं असता ‘कपडे घालणं किंवा कसे कपडे घालायचे हे ठरवणे तिचे स्वातंत्र्य आहे. यामुळे ते कायद्याविरोधात असू शकत नाही, असं भाष्य केलं जात आहे. एकूणच उर्फीचे कपडे कोणाला आवडले नाही तर ती अश्लीलता कशी म्हणावी असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
 
उर्फिचे ट्वीट द्वारे उत्तर
 
चित्रा वाघ आणि उर्फिचा हा वाद सुरु असताना दुसरीकडे मात्र उर्फिने ट्वीटरवर केलेले ट्वीट समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. उर्फी चित्रा वाघ यांना डिवचण्याची एक संधी सोडत नाहीये. कोणत्या न कोणत्या पोस्ट च्या माध्यमातून उर्फी त्यांना उत्तर देत डिवचत आहे.
 
‘उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी गं तू सास’ असं मराठीतून केलेले ट्वीट उर्फीनं शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. उर्फीच्या या ट्वीटला अनेकांनी लाइक केलं असून काही नेटकऱ्यांनी हे ट्वीट रिट्वीट देखील केलं आहे. 
 
दुसरे ट्वीट – ‘चित्रा ताई मेरी खास है,  फ्यूचर में होने वाली सास है’ उर्फीच्या या ट्वीटनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे. 
 
त्या आधी उर्फिने ‘मेरी डीपी इतनी धासू, चित्रा मेरी सासू’ असे अनेक पोस्ट उर्फिने केले आहे.
मात्र दुसरीकडे या सर्व प्रकरणाबद्दल एक गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. उर्फीचे कपडे एवढे महत्त्वाचे आहेत का? त्यापेक्षा महत्त्वाचे महिलांचे प्रश्न नाहीत का ? असा प्रश्न समाज माध्यमांच्या कट्ट्यावर उपस्थित केला जात आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नगरपरिषदा, महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तब्बल 40 हजार पदांच्या भरतीचे आदेश