Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

महिलेची सोनोग्राफी, डॉक्टरचे अश्लील कृत्य गुन्हा दाखल, खंडणी साठी गुन्हा डॉ.चा आरोप

महिलेची सोनोग्राफी, डॉक्टरचे अश्लील कृत्य गुन्हा दाखल, खंडणी साठी गुन्हा डॉ.चा आरोप
कोल्हापूर येथे सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या गर्भवती महिलेशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी येथील डॉक्टरवर  गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. संतोष मुरलीधर वाघुले (वय ४६, रा.  कावळा नाका) असे  संशयित डॉक्टरचे नाव असून,  प्रकरणाची सखोल  चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन रेडीऑलॉजिस्ट संघटनेने बुधवारी पोलिसांना दिले आहे.

या पीडित महिलेवर जानकी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तेथील डॉक्टरांच्या सल्लय़ाने ती पहिली सोनोग्राफी करून दुसऱ्या सोनोग्राफी करिता १९ नोव्हेंबर रोजी महिला सासऱ्यांना घेऊ न डॉ. वाघुले यांच्याकडे गेली.तेव्हा डॉ. वाघुले याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते,  तक्रार आहे.   संबंधित महिला २१ डिसेंबरला शाहुपुरी पोलीस ठाण्यात डॉ. वाघुले याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेली.  मात्र शाहुपुरी पोलिसांनी  तक्रार घेण्यास टाळाटाळ केली होती. मात्र जेव्हा तिने तक्रार मुख्यमंत्री, राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे ईमेल द्वारे केली. या प्रकारची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तत्काळ डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र हे आरोप खोटे असून खंडणी वसूल करायला केले आहेत असा आरोप डॉक्टरांनी केला आहे. हे सर्व आरोप हेतू पुरस्कर आणि जाणीवपूर्वक केले आहे असे संघटनेणे केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मी भाजपा सोडणार नाही - एकनाथ खडसे