तिसऱ्या श्रावण सोमवारी निमित्ताने शहरातील वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. या वाहतूक मार्गाबाबत पोलिस आयुक्तालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून व्यवस्था केली आहे. या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असल्यामुळे या बस स्थानकाच्या लगत हे बदल करण्यात आले आहे.
आयुक्ताने प्रसिध्द केलेल्या पत्रकामध्ये सीबीएस चौक शरणपूर रोड टिळकवाडी चौफुली पर्यंत जाणाऱ्या रोडवर एसटी बसेस व शहर वाहतुकीच्या बसेस वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सीबीएस चौकातून टिळकवाडी सिग्नलकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी सीबीएस चौकातून मोडक सिग्नल हॉटेल राजदूत मार्गे किंवा सीबीएस सिग्नल येतो मेहर सिग्नल अशोक स्तंभ मार्गे गंगापूर रोड चालू ठेवण्यात आला आहे. तसेच शरणपूर रोडवरील टिळकवाडी सिग्नल येथून सीबीएस चौकाकडे एसटी बसेस व शहर वाहतूक बसेस वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. टिळकवाडी सिग्नल येथून सीबीएसकडे जाणारी वाहतूक ही टिळकवाडी सिग्नल जलतरण तलाव सिग्नल मोडक सिग्नल वरून सीबीएस कडे जातील किंवा टिळकवाडी सिग्नल वरून पंडित कॉलनी मार्गे गंगापूर रोडने अशोक स्तंभ मार्गे पुढे इतरत्र वाहनांसाठी असणार आहे. रुग्णवाहिका शववाहिका अग्निशामन दलाची वाहने, पोलीस वाहनांकरिता हे रस्ते मात्र चालु राहणार आहे.