Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सपा आमदार अबू आझमी विधानसभेतून अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत निलंबित

abu azmi
, बुधवार, 5 मार्च 2025 (15:23 IST)
औरंगजेबाच्या समर्थनार्थ विधान केल्यावर सपाचे आमदार अबू आझमी हे अडचणीत आले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात गदारोळ झाला. त्यांच्या विधानामुळे राज्यात त्यांच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या विधानाला मागे घेत जाहीर माफी मागितली आहे. 
एकनाथ शिंदे यांनी अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अबू आझमी यांना विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेतून अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे. 

पीटीआय कडून मिळालेल्या माहितीनुसार, सपा आमदार अबू आझमी यांचे सभागृहाचे सदस्यत्व चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरी पर्यंत निलंबन केले आहे. अबू आझमी हे समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष असून मुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघाचे आमदार आहे. 
निलंबन केल्यावर अबू आझमी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले, मी माझ्या विधानाला मागे घेतले आणि माफी मागितली असून देखील माझे निलंबन करण्यात आले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधानसभेतून निलंबित केल्यावर अबू आझमी यांनी दिली प्रतिक्रिया