Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चलो गोवा : नाताळ, नवीन वर्ष सेलिब्रेशसाठी विशेष ट्रेन

चलो गोवा : नाताळ, नवीन वर्ष सेलिब्रेशसाठी विशेष ट्रेन
, गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (10:58 IST)
नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ४३ विशेष  ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी,पनवेल ते करमाली दरम्यान या विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहे. 
 
लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाली स्पेशल ट्रेनच्या १४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. दर शुक्रवारी रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे. त्याच दिवशी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी करमालीला पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१०४६ ट्रेन दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटून त्याच रात्री १२ वाजून २० मिनिटांनी एलटीटीला पोहचणार आहे. ही ट्रेन २२ नोव्हेंबर ते ३ जानेवारी दरम्यान चालविण्यात येणार आहे.
 
एलटीटी-करमाली ट्रेन दर शुक्रवारी (२२ नोव्हेंबर ते ३ जानेवारी) रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी करमालीला पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ट्रेन दर रविवारी (२४ नोव्हेबंर ते ५ जानेवारी) दुपारी १ वाजता सुटणार आहे आणि रात्री १२ वाजून २० मिनिटांनी एलटीलीला पोहचणार आहे.  
 
या दोन्ही स्पेशल ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ ,सावतंवाडी आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
 
याशिवाय पनवेल-करमाली स्पेशल ट्रेन दर रविवारी रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार आहे. त्याच दिवशी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी करमालीला पोहचणार आहे. ही ट्रेन २३ नोव्हेंबर ते ५ जानेवारी दरम्यान सुटणार आहे.
 
या स्पेशल ट्रेनला रोहा,माणगाव, खेड,चिपळुण, संगमेश्वर रोड,रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग कुडाळ ,सावंतवाडी आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. प्रवासी या स्पेशल ट्रेनचे आरक्षण २०  नोव्हेंबर पासुन सुरू करण्यात आलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप्परे, महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढला