Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंदोलनातील ST कर्मचाऱ्याचा मृत्यू!

आंदोलनातील ST कर्मचाऱ्याचा मृत्यू!
, शनिवार, 9 एप्रिल 2022 (10:42 IST)
राज्यातील एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागल्यानंतर आता आंदोलक आणि सरकार, पोलिस असा वाद पेटल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी मध्यराीत्री जबरदस्ती आझाद मैदानातील आंदोलकांना तेथून हाकलून लावले. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे आंदोलक कर्मचार्‍यांना संताप व्यक्त केला आहे. या कारवाईदरम्यान एका कर्मचार्‍याचा मृत्यू जाल्याची घटना घडली. महेश लोले असं या एसटी कर्मचार्‍याचं नाव असून ते कोल्हापूर कागल आगारातील कर्मचारी आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली. एसटी कंडक्यर महेश लोले यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, लोले यांचा आंदोलकांशी काही संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
 
राज्यात एसटी कामगारांचा संप गेल्या चार महिन्यापासून सुरु आहे. मात्र, शुक्रवारी कर्मचार्‍यांचे आंदोलन चिघळले. एसटी कर्मचार्‍यांनी काल शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर हल्ला केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Best from Waste : मंदिरात अर्पण केलेल्या फुलांपासून या ठिकाणी बनवल्या जाते धूप आणि अगरबत्ती