Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी योजना - देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
, शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (23:33 IST)
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतीच्या फिडरचे सोलरायजेशन करण्याची योजना करत आहे लवकरच स्वतंत्र फिडरवर जागा उपलब्ध करून सोलर लावून सोलरवर फिडर ट्रान्सफर केले जाईल.जेणे करून सोलरायजेशन केल्यावर एजी फिडरवरील विजेचा प्रश्न सोडवता येईल. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

पिण्याच्या पाण्याच्या योजना देखील फिडर वर आहे पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत एकत्रित 88 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले असून त्यामुळे पाणी पुरवठा योजनांच्या अंर्तगत येणाऱ्या समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. वर्धाच्या जिल्हा परिषदेत नियोजन समितीची बैठक सिंधुताई सपकाळ सभागृहात घेण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील विकास कामाचा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. 
समितीची बैठक झाल्यावर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले. 
 
283 कोटींच्या जिल्हा विकास कामांचा आढावा घेत चालू कामांची माहिती देखील घेतली आहे. लोकप्रतिनिधींनी काही विषय मांडले. त्यावर आमची सविस्तर चर्चा झाली असून पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर नाला खोलीकरण, सरळीकरण, नद्यांचा गाळ काढण्यासारखे  महत्त्वाच्या विषयांची बोलणी झाली.या सर्व विषयांचा एकत्रितरित्या सर्व्हे करून जलसंधारण, जलसंपदा आणि लोकसहभाग अशा तिघांच्या प्रयत्नातून टप्प्याटप्प्याने कामे हातात घेत. ज्या शहरांमध्ये, गावांत शिरले आणि जे काही नुकसान झाले, तशी परिस्थिती येत्या काळात उद्भवणार नाही, यासाठी नक्कीच  प्रयत्न करणार आहोत'
  
राज्यात 'अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एनडीआरएफच्या दुप्पट निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून  52 टक्के पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले असून उर्वरित आठवडाभरात जमाहोतील, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.65 मि.मी. पाऊस झाला नसेल तरी पण सातत्याने पाऊस झाला असेल  आणि पाऊसामुळे 33टक्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असेल तर शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
'दोन हेक्टरपर्यंत जास्त धारणा असल्यास तरीही  खरडून निघालेल्या शेतीकरिता शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. वर्धा जिल्ह्याचे प्रश्न समजून घेऊन ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल . महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कामांबाबत काही तक्रारी होत्या. त्या कामांना वेग देण्यात येण्याचे  निर्देश फडणवीस यांनी दिले.
 
. ते म्हणाले ,बर्‍याच शेतकर्‍यांच्या मंजूर विहिरीचे बांधकाम झाले नाही. काहींचे बांधकाम झाले पण त्यांना निधी मिळाला नाही. त्याचा एकत्रित प्रस्ताव मागितला आहे. धडक सिंचनच्या विहिरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती या वेळी फडणवीस यांनी दिली. 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता हॅलो नाही वंदे मातरम म्हणावं, अभियानाला 2 ऑक्टोबर पासून शुभारंभ