राज्यात 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यंदा राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाना पाच लाख रुपये, अडीच लाख रुपये आणि तृतीय क्रमांक मिळणाऱ्या मंडळाला एक लाख रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. स्पर्धेत अधिक संख्येत भाग घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी केले आहे.
2022 मध्ये राज्य शासनाकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार दिले होते. आता 2023 मध्ये देखील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठीचा निधी आणि पुरस्काराचे निकष बाबतीत राज्यशासनाकडून निर्णय जारी केले आहे. अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
या पुरस्कारासाठीच्या 24 लाख 60 हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या
[email protected] या ई- मेल आयडीवर 10 जुलै ते 5 सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करावी.